वनअधिकारीवर हल्याचा प्रयत्न, व्हिडीओ वृत्तांत व सविस्तर

बातमी कट्टा:- कारवाई साठी गेलेल्या वनअधिकारीवर जिवघेना हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना दि ९ रोजी घडली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वनक्षेत्रात अवैधरित्या जेसीबीद्वारे खोदकाम करुन वृक्षाची कत्तल करण्यात आल्याचे आढळून आल्याने जेसीबी व क्रेटा वाहन वनविभागाच्या पथकाने जप्त केले आहे.

व्हिडीओ बघण्यासाठी लिंक करा https://youtu.be/BmQcBBrYc58?si=DiJUuzH7dMGtF5gi

दि ९ रोजी शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील वनहद्दीत जेसीबी द्वारे खोदकाम करुन मुळासकट वृक्षतोड करण्यात येत असल्याची माहिती वनअधिकारी काशिनाथ देवरे यांना प्राप्त झाली होती.या माहितीद्वारे वन अधिकारी काशिनाथ देसले व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.यावेळी जेसीबी चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनास्थळी जेसीबी द्वारे मुळासकट वृक्षतोड झाल्याचे घटनास्थळी पथकाला दिसून आले.यावेळी कार्यवाही सुरु असतांना एम एच १८ ए जे १५१६ क्रमांकाच्या क्रेटा या पांढऱ्या रंगाचा कारने आलेल्या मनोज गोवर्धनराव जाधव या जेसीबी मालकाने वनअधिकारी सोबत हुज्जत घातली.

व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/BmQcBBrYc58?si=DiJUuzH7dMGtF5gi

दगड फेकत जिवे मारण्याची धमकी दिली. धक्काबुक्कीत एक महिला कर्मचारीला धक्का दिल्याने खाली पडून महिला कर्मचारीच्या खांद्याजवळ मुक्का मार लागला.यावेळी वन अधिकारींनी वरिष्ठ अधिकारी आणि शिरपूर शहर पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

व्हिडीओसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/BmQcBBrYc58?si=DiJUuzH7dMGtF5gi

वनविभागाच्या पथकाने यावेळी जेसीबी व क्रेटा वाहन शिरपूर वनविभागाच्या कार्यालयात जप्त केले असता पोलिसांच्या उपस्थितीत क्रेटा वाहनाची तपासणी केली असता क्रेटा वाहनात सागवनचे लाकूड आढळून आले आहे. याप्रकरणी वन अधिकारी काशिनाथ देवरे यांनी शिरपूर शहर पोलिस स्टेशन येथे मनोज गोवर्धनराव जाधव रा. शिरपूर यांच्या विरुध्दात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: