वन्यप्राणीचा हल्ला,दोन जण गंभीर, बिबट्या की तरस ?

बातमी कट्टा:- वन्यप्राण्याचा धुमाकूळ सुरु असून रात्रीच्या सुमारास रखवालदार म्हणून शेतात झोपलेल्या रखवालदारावर वन्य प्राणीने हल्ला केला तर आज सकाळी एका 14 वर्षीय मुलावर त्या वनप्राणीने हल्ला केला आहे. यात रखवालदाराला रात्री जखमी अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आले. हल्ला करणारा हा वन्यप्राणी बिबट्या की तरस ? याबाबत ठोस माहिती मिळु शकलेली नाही. घटनास्थळी वनविभाग,प्राणी मित्र व पोलीस प्रशासन दाखल झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील गोदी(सावेर) शिवारात वसंत लिलाचंद राजपूत यांच्या शेतात अमसिंग किलगसिंग पावरा हा रखवालदार म्हणून काम सांभाळतो. नेहमी प्रमाणे अमसिंग हा रात्री शेतातील झोपडीच्या बाहेर झोपलेला असतांना अचानक एका हिंसक प्राणीने त्याचा हातावर हल्ला केला.त्याने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी तो हिंसक प्राणी ऊसाच्या शेताच्या दिशेने पळून गेला.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे पथक सह वनविभाग व प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले होते.अमसिंग याला जखमी अवस्थेत रात्री शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथून पुढील उपचारासाठी धुळे पाठविण्यात आले आहे.अमसिंग पावरा याच्या हातावर दुखापत झाले आहे.तर आज दि 19 रोजी गोदी शिवारात सकाळी सुधाकर सोनजी धनगर यांच्या शेतात जाणाऱ्या विजय ताल्या पावरा वय 14 याच्यावर देखील वन्यप्राण्याने हल्ला करत पायावर दुखापत करण्यात आले आहे.हल्ला करणारा प्राणी बिबट्या होता की तरस हे समजू शकलेले नाही.घटनास्थळवरील वन्यप्राण्याच्या पायाचा ठस्सा घेतल्यावरच त्या हिंसक प्राणीची ओळख पटू शकणार आहे.घटनेची माहिती परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: