वाळू घाटात रात्रीस खेळ चाले !!!

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात शासनाने परवानगी दिलेल्या वाळू घाटात नियमबाह्य पद्धतीने काम सुरु असल्याचे उघड होत आहे.चक्क नदीपात्रातून वाळूने डंपर भरण्यात येत असल्याचा प्रकार घडत असून याबाबत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत नसून गैरप्रकाराला अभय कोणाचे असा सवाल उपस्थित होत आहे.

शिरपूर तालुक्यातील उप्परपींड या वाळू घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास गैरपध्दतीने वाळू उपसा सुरु असून आमचं कोणीच काही करु शकत नाही अशी काहीशी भुमिका ठेकेदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.सर्रास सुरु असलेला गैर प्रकारावर शासन का लक्ष देत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

उप्परपींड येथील वाळू घाटात रात्रभर वाळू उपसा सुरु असतो.नियमानुसार सायंकाळ पासून वाळू उपसा बंद होणे अपेक्षित असतांना दोन्ही वाळू घाटातून रात्रभर वाळू उपसा व वाहतूकीचा प्रकार हा सुरु आहे. रात्रीस चालणार खेळ महसूल प्रशासन थांबवणार का ? यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: