
बातमी कट्टा:- वाळूने भरलेला भरधाव ट्रक उलटून चालकाचा जागिच मृत्यू झाल्याची घटना घडली असून ट्रकमध्ये सोबतचा क्लिनर जखमी झाला आहे.सदर घटना दि १७ फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार विकास दिलीप बोरसे पाटील (रा. गव्हाणे ता. शिंदखेडा)हा क्लिनर देविदास श्रीराम बोरसे सोबत एम.एच 18 बिऐ 1634 क्रमांकाच्या ट्रकने गुजरात राज्यातील निझर येथून ट्रकमध्ये वाळू भरून बुलढाणा येते घेऊन जात असतांना दि 17 रोजी पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास दोंडाइचा ते शिंदखेडा रस्त्यावरील बाह्मणे गावाच्या अलीकडील विश्वकर्मा वेल्डिंग दुकानासमोर ट्रक उलटला यात चलाक दिलीप बोरसे व क्लिनर देविदास बोरसे दोघांना नागरिकांनी दोंडाईचा येथील रुग्णालयात दाखल केले यावे डॉ अमोल भामरे यांनी चालक दिलीप बोरसे यांना तपासून मृत घोषित केले.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
