वाळूमाफीयांनी प्रांताधिकारींचा गळा आवळून जिवे मारण्याचा केला प्रयत्न,दगडफेकीत प्रांताधिकारींसह चार कर्मचारी जखमी….

बातमी कट्टा:- अवैध वाळु वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळूमाफियांनी दगडफेक करत प्रांताधिकारी यांचा गळा आवळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दगडफेकीत प्रांताधिकारी यांचा डोळा थोडक्यात बचवला असून हात व कंबरेवर मार लागला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार एरंडोलचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड व महसूलचे पथक यांना माहिती मिळाली की गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत आहे. त्या माहिती नुसार प्रांताधिकारी व पथक शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेले होते. यावेळी नदीपात्रात १० ते १२ ट्रॅक्टरांमध्ये वाळू भरण्याचे काम सुरु होते.

यावेळी महसूल पथकाला बघून काही जणांनी तेथून पळ काढला.मात्र तिथे उपस्थित चार ते पाच वाळू माफियांनी महसूल पथकासोबत हुज्जत घातली.हात पाय तोडण्याची धमकी देत ईतर संशयितांना बोलवून घेतले.यावेळी वाळु माफीयांनी दगडफेक करत प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड व त्यांच्या पथकातील चार ते पाच जणांना हाता बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना खाली पाडून त्यांचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र यावेळी पोलिस पाटील व इतर दोन जणांनी प्रांताधिकारी यांच्या अंगावर आडवे होत त्यांची सुटका केली.

या घटनेत प्रांताधिकारी गायकवाड यांचा डोळा थोडक्यात बचावला तर हात व कंबरेवर मार लागला आहे.तर इतर चार कर्मचारीवर एरंडोल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी संशयित राजेंद्र पाटीलसह इतर १० ते १२ जणांविरुद्ध कासोदा पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: