
बातमी कट्टा:- दि.७ रोजी जिल्हा परिषद सदस्या बेबीताई पावरा व वकील भगतसिंग पाडवी यांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्यावर डॉ जितेंद्र ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रातून त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असून यावर विश्वास ठेऊ नये विरोधकांना धडकी भरल्यामुळे, मतदार माता बघिनींची दिशाभुल करण्याचा दृष्ट हेतु साध्य करण्याचा हा केवीलवाना प्रयत्न केल्याचे डॉ ठाकूर यांनी म्हटले आहे.
डॉ जितेंद्र ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये सांगितले की विरोधकांना धडकी भरल्यामुळे, मतदार माता बधिनींची दिशाभुल करण्याचा दृष्ट हेतु साध्य करण्याचा केविलवाना प्रयत्न केला असून सामान्य जनतेला सदरचे षडयंत्र व त्यामगचे करते करविते विरोधी पक्षातील धन धनाड्यांबाबत संपूर्ण जाण आहे. तरी देखील जाती जमार्तीमध्ये गैरसमज पसरविण्याचा व द्वेष निर्माण करुण ऐन विधानसेभा निवडणुकीच्या तोंडावर सदरचे कुभांड रचुन स्वतःचा स्वार्थ साध्य करण्याचा गैर हेतु आहे. जाती जातींवर विरोध करण्याऐवजी गोरगरीब आदिवासी बांधवांच्या मुलभुत गरजा सोडविण्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे असल्याचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे
डॉ ठाकूर पुढे पत्रकात म्हटलेत की, जनतेमध्ये गैरसमज पसरुनये म्हणून डॉ ठाकूर यांना हे उत्तर देणे भाग पडले आहे. संबंधीतांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही एक तथ्य नाही. मुळात संपूर्ण महाराष्ट्रात रहिवास करण्याऱ्या ठाकूर अनुसुचित जमातीस भारत स्वातंत्र्य झाल्यापासून व आरक्षणाबाबत प्रथम राष्ट्रपती आदेश सन १९५० ला लागु झाल्यापासून अनुसुचित जमाती संवर्गात वर्गीकृत करण्यात आले होते व आहे आणि तेव्हापासून आजतागायत डॉ ठाकूर सर्व अनुसुचित जमातीचे लाभ देखील घेत आहोत. मात्र सदरच्या गैर प्रवृत्तींनी डॉ ठाकूर यांना वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच आधारावर काल केलल्या आरोपांमध्ये खान्देशात ठाकूर अनु. जमाती वर्गात येत नाही त्यास सन १९५६ ला क्षेत्रबंधन लागु केल्या मुळे ठराविक जिल्हे व त्यातील तालुक्यांमधीलच ठाकूर हे अनु. जमातीत मोडतात असा बेछुट व चुकीचा अपप्रचार करण्यात आला. मुळात महाराष्ट्र शासनालाच या सदरच्या चुकीच्या अन्यायकारक अश्या क्षेत्रबंधनबाबतची अट ही चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सन १९७६ ला कायद्यात दुरुस्ती करुण सन १९५० पासूनच्या सवलती पुर्ववत प्रदान करण्यात आलेल्या आहेत व आज पर्यंत सवलती चालु आहेत. आणि सदरची बाब मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील अधोरेखीत केलेली आहे. मात्र असे असतांना देखील बेछूट आरोप करून जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच गैरप्रवृत्तीमुळे संबंधीत तथाकथित आदिवासी नोकरवर्ग ठाकूर उत्कर्ष संस्था हिला मा. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांनी याचिका क्रं. ३२६६/२०२१ मध्ये नुकताच म्हणजे दि. ०२/०७/२०२४ रोजी आदेश पारित करुण रक्कम रुपये १०,०००/- दंड देखील ठोठावला आहे. सदरचे आरोप करून संबंधीतांनी मा. सर्वोच्च न्यायालयाचा व उच्च न्यायालयाचा देखील अवमान केलेला आहे. सुमारे ११ वर्षांपुर्वी संपुर्ण चौकशीअंती समितीस्तरावर वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. संबंधीतांनी दृष्ट हेतुने विधानसभा निवडनुकीची पार्श्वभुमीवर जनतेचे वाढते प्रेम बघुन ११ वर्षांनंतर पुन्हा डॉ ठाकूर यांचे वैधता प्रमाणपत्रास पडताळणी समिती येथे आव्हानित केले होते ज्यात पुन्हा सखोल चौकशी करून बेबीताई पावरा यांचे संपुर्ण कथन नव्याने ऐकून डॉ ठाकूर खऱ्या अनु. जमातीतील असल्याने श्रीमती. पावरा यांची तक्रार खारीज करून डॉ ठाकूर यांना ११ वर्षांपुर्वी दिलेले वैधता प्रमाणपत्र हे खरे व योग्य आहे असे २७ पानी निकाल देखील समितीने दि. २५/०७/२०२४ रोजी पारित केलेला आहे. यावरून देखील संबंधीतांची गैर व खोटी प्रवृत्ती निदर्शनास येते. येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेपासून लांब करून न्यायालयीन प्रक्रीयेत व्यस्त ठेऊन वत्रास देऊन संबंधतांनी माझ्या विरुध्द पुन्हा मा. उच्च न्यायालयात समितीच्या आदेशास आव्हान दिलेले आहे. सदरचे प्रकरण मा. उच्च न्यायालयात प्रलंबीत असतांना न्यायालयाचा आदेश घेण्यापुर्वी स्वतःला न्यायाधिश समजुन माझ्यावर खोटे आरोप करूण विरोधकांच्या मनात माझ्याबद्दल धडकी भरल्याचे पुर्णपणे सिद्ध होते असे डॉ ठाकूर यांनी म्हटले आहे.
कालच्या मुलाखतीत आरोप करणे म्हणजे स्वतःला सर्वोच्च मा.न्यायालयापेक्षा मोठे समजण्यासारखे आहे. जे न्यायालयाच्या आदेशांचा आदर राखत नाहीत ते सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर राखुच शकत नाही हे कालच्या पत्रकार परिषदेतुन अधोरेखीत करुन दिले आहे. संबंधीतांनी खोट्या स्वरुपाचे आरोप करून जनतेची दिशाभूल न करता प्रामाणिकपणे जनतेची सेवा करूण जनतेच्या मनात आस्था निर्माण करणे गरजेचे होईल. माझा भारतीय संविधानावर पुर्ण विश्वास असून भारतीय लोकशाहीचा पाया मजबुत करण्यासाठी सर्वांनी संविधानिक पद्धतीने निवडणुक प्रक्रीयेत भाग घेणे आवश्यक होईल. कुण्या स्वार्थी, विरोधी व एकअधिकारशाही धनाड्यांच्या आहारी जावूण असंविधानीक कृत्य कोणीही करु नये. कालच्या झालेल्या पत्रकार परिषेदाचा करता करविता धनी कोण आहे ???? हे संपुर्ण तालुका व तालुक्यातील आदिवासी बांधव जाणुन आहेत.मायबाप जनतेनेही असल्या अफवांना व आरोपांना बळी पडु नये असे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी पत्रकान्वये सांगितले आहे.