बातमी कट्टा:- आई वडीलांसोबत शेतीकामासाठी गेलेल्या बालकाला विषारी सापाने दंश केल्याने अकरा वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील बेलदार वाडी ही लहान वस्ती आहे. तेथील 5 वी शिक्षण घेणारा विक्की अंकुश बेलदार हा 11 वर्षीय बालक आपल्या आई वडीलांसोबत शेतीत गेला होता.यावेळी विक्की दुपारी शेतात खेळत असतांना त्याला विषारी सर्पाने दंश केला याबाबत विक्की या बालकाने शेतातील महेंद्र पाटील यांना माहिती दिली.सापाने दंश केल्याचे लक्षात येताच विक्कीला गावातील महेंद्र पाटील व धनराज पाटील यांनी सोनगीर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले.धुळे येथे उपचार सुरु असतांनाच अखेर त्याचा मृत्यू झाला.
विक्की याचे कुटुंब शेतातील कामे व मोल मजुरीकरुन उदर्निवाह करत असतात.विक्की याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने बेलदार कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले आहे.विक्की च्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ ऐक बहिण असा परिवार होत.