
बातमी कट्टा:- शेतात काम करत असतांना अचानक अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि 23 रोजी दुपारच्या सुमारास घडली.याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 23 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेदरम्यान शिरपूर तालुक्यातील भोईटी परिसरात वादळी वारासह पाऊसाने हजेरी लावली. यादरम्यान भोईटी येथील भंगी भुरला पावरा वय 30 हे भोईटी शिवारात अनेर नदी शेजारी असलेल्या शेतात काम करत असतांना भंगी पावरा यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते बेशुद्ध अवस्थेत शेतात पडलेल्या स्थितीत होते. भाऊ दिलीप भुरला पावरा यांनी भंगी पावरा यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी भंगी पावरा यांना मृत घोषित केले आहे.
