व्हिआयपी कारमध्ये सुरु होती वाहतूक, पोलिसांनी राजस्थान येथील दोघांना घेतले ताब्यात

यासह व्हिडीओ वृतांत बघण्यासाठी चैनल सबस्कराईब करा

बातमी कट्टा:- व्हिआयपी वाहनांमध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसाय रात्रीच्या सुमारास पोलीसांनी उघडकीस आणला आहे.या कारवाईत निसान कंपनीचे दोन डस्टर वाहन पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यातील अवैध दारु देखील जप्त करण्यात आली आहेत.

पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या अधारे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पथकाने रात्री 2 ते 3:30 वाजेच्या सुमारास पिंपळनेर ते सटाणा रस्त्यावर दोन वाहनांचा तपास सुरु केला.यावेळी शेलबारी गाव शिवारातील देवनारायण हॉटेल जवळ रोडच्या बाजुला जी.जे 05 जेएफ 3465 व जीजे 21 ए एच 9390 या दोन निसान कंपनीच्या डस्टर चारचाकी कार दिसले पोलिस येत असल्याचे बघुन दोन्ही वाहन चालकांनी वाहने पळविण्याचा प्रयत्न केला पोलीसांनी पाठलाग सुरु केला अचानक समोर मोठे वाहने असल्याने अडथळा निर्माण झाल्याने दोघेही जण वाहने रस्त्यात उभे सोडून आंधारत पळ काढला मात्र ते रस्त्याकडे पळाले तेथे रस्त्याचे काम सुरु असल्याने दोघेही खाली पडले पोलीसांनी अखेर द़ोघांना ताब्यात घेतले.

नाव विचारले असता विरेंद्रसिह गिरधारीसिंह राठोड व जितेंद्रसिंह गिरधारीसिंह राठोड दोघेही राहणार दहिमथा जि.भिलवाडा राजस्थान असे सांगितले पोलीसांनी दोघांना ताब्यात वाहनाची तपासणी केली असता वाहांमधून दोन लाख किंमतीचे देशी विदेशी दारुसह 14 लाख 50 किंमतीचे दोन डस्टर कार असा एकुण 16 लाख 50 हजाराचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह वळवी,महाजन,भुषण वाघ,पंकज वाघ सुर्यवंशी व फिर्यादी ग्यानसिंग पावला आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: