शिक्षकांनी विदयार्थींच्या घरी जाऊन गुलाब पुष्प देऊन केले स्वागत….

बातमी कट्टा:- किसान विद्या प्रसारक संस्था संचालित डॉ.विजयराव व्ही रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल येथील शिक्षकांनी विदयार्थी प्रतिनिधींचे व नवगत विदयार्थ्यांचे प्रत्यक्ष घरी जाऊन औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

कोरोना विषाणूमुळे आपल्या जीवनपद्धतीत अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. माणसाची जीवन शैली बदलली.आणि प्रत्यकातच वैचारिक व्यवहारिक, मानसिक सगळ्याच स्वरूपात बदल झालेत त्यापैकी एक सध्याचा परिस्थितीतील महत्वाचा बदल म्हणजे ऑन लाईन शिक्षण होय.अडचणीच्या काळात एक पर्यायी उपलब्धता म्हणून शासन निर्णयानुसार स्वीकारलेल्या पद्धतीचे महत्व मनीषा लोखंडे यांनी यावेळी पटवून दिले. व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वर्गशिक्षक स्वाती चव्हाण, उमेश राजपूत, मनीषा पटेल,पवित्रा राजपूत आदी उपस्तीत होते. शिक्षक आल्याने पालक विदयार्थी भारावून गेले.

WhatsApp
Follow by Email
error: