शिरपूर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदी बिनविरोध निवड…

बातमी कट्टा : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पंचायत समिती सभापतीपदी लताबाई वसंत पावरा (दुर्बड्या) व उपसभापतीपदी विजय संतोष बागुल (थाळनेर) यांची बिनविरोध निवड झाली.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी जनक व्हीला निवास स्थानी सर्व पंचायत समिती सदस्यांची बैठक घेतली.यात माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर पंचायत समिती सभापतीपदी लताबाई वसंत पावरा (दुर्बड्या) व उपसभापतीपदी विजय संतोष बागुल (थाळनेर) यांची निवड जाहिर केली. यावेळी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, माजी सभापती सत्तारसिंग पावरा, माजी उपसभापती धनश्री बोरसे, सर्व सदस्य उपस्थित होते.

त्यानंतर दुपारी 12.15 वाजता पीठासीन अधिकारी तहसीलदार आबा महाजन यांच्या कडे सभापती पदासाठी लताबाई वसंत पावरा (दुर्बड्या) व उपसभापती पदासाठी विजय संतोष बागुल यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी सहाय्यक पीठासीन अधिकारी गटविकास अधिकारी एस. टी. सोनवणे उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 3 वाजता छाननी होऊनदोन्ही नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड जाहिर करण्यात आली.यावेळी जल्लोषात सभापती लताबाई वसंत पावरा (दुर्बड्या) व उपसभापती विजय संतोष बागुल यांचा सत्कार करण्यात आला.

WhatsApp
Follow by Email
error: