
बातमी कट्टा:- शिरपूर विधानसभा निवडणुकीत बिजेपीचे उमेदवार जवळपास निश्चित असतांना महाविकास आघाडी कोणाला उमेदवारीची संधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाविकास आघाडीतील कुठला पक्ष शिरपूर विधानसभेला मिळतो याबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.

शिरपूर विधानसभेत बिजेपीचे आमदार काशिराम पावरा हेच पुन्हा उमेदवारी करतील अशी सर्वत्र चर्चा आहे.मात्र महाविकास आघाडी पक्षातून शिरपूर तालुक्यातसाठी कुठला पक्ष उमेदवारी घेईल याबाबत वेगवेगळ्या पध्दतीने तर्कवितर्क लावण्यात येत आहे. महाविकास आघाडी पक्षातील शिरपूर तालुक्यातील इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत.महाविकास आघाडी कुठल्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवाराला संधी देतात याबाबत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काटे की टक्कर देणारे डॉ जितेंद्र ठाकूर हे देखील महाविकास आघाडी पक्षाकडून इच्छूक आहेत.त्यांनी कामाला सुरुवात देखील केली आहे.डॉ जितेंद्र ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटात काम करत आहेत.मात्र जागा वाटपात महाविकास आघाडीतील हायकमांड शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी जाहीर करतात याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी बिजेपीचे आमदार काशिराम पावरा यांच्या विरोधात दोन वेळा विधानसभा निवडणुक लढली आहे एक वेळा बिजेपी पक्षाकडून तर दुसऱ्यांदा अपक्ष निवडणूक लढली होती त्यात दोन्ही वेळा डॉ जितेंद्र ठाकूरांना पराभव स्विकारावा लागला होता.मात्र नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मतांच्या आकडेवारी नुसार शिरपूर तालुक्यात या विधानसभा निवडणुकीत काय चित्र असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.