बातमी कट्टा:- शिरपूर नगरपालिकेने अनेक पुरस्कार पटकावले आहेत.शिरपूर स्मार्ट सिटी असल्याचे सर्वत्र बोलले जाते मात्र शहराचा विकास होत असतांना येथील ग्रामीण भागाची अवस्था काय ? याचा जर विचार केला तर नक्कीच शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा ग्रामीण भागांतील जनतेच नेतेमंडळींनी विचार केला का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
शिरपूर तालुक्यातील आज ही काही गावे जे मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तेथील ग्रामस्थ मूलभूत सुविधांसाठी नेहमी झगडतांना दिसतात.नेत्यांकडून शहराचा विकास करतांना येथील ग्रामीण भागाचा विचार केला गेलाच नाही. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांकडे होणारे दुर्लक्ष ,गावा गावात पाण्यासाठी केला जाणारा संघर्ष, घरकुल,वीज,रस्ते असे एक ना अनेक प्रश्न असतांना शहराच्या विकासात गुंतलेल्या नेत्यांनी ग्रामीण भागाचा विचार करणे देखील महत्वाचे होते.शिरपूर शहराचा नेहमी विचार केला गेला मात्र ग्रामीण भागाचे विकासाचे काय ?,याकडे कोण लक्ष देणार हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागाला सावत्राच्या भूमिकेत ठेवल्याने शिरपूर ग्रामीण भागाचा जसा विकास पाहिजे होता तो तसा झाला नाही. ग्रामीण भागातील आदिवासी बहुल भागातील वीज व पाणी रस्त्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे.काही गावात आज ही अमरधाम नाहीत. यामुळे शहराला जरी अनेक पुरस्कार मिळाले असले तरी येथील ग्रामीण भागाची व्यथा व त्यांचा खूंटलेला विकासाचे काय याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. शहाराला स्मार्ट सिटी बनविण्याचा नादात तालुक्यातील ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष नको व्हायला याचा नेते मंडळींनी विचार करणे गरजेचे आहे.