बातमी कट्टा: महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे शिरपूर वरवाडे नगरपरिषद अंतर्गत शहरातील विविध विकास कामांसाठी 10 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांनी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन शिरपूर वरवाडे नगर परिषद अंतर्गत शहरातील विविध विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये याप्रमाणे एकूण 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.
आमदार अमरिशभाई पटेल यांनी दिलेल्या पत्रानुसार, शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपये, वरवाडे शिवारातील सर्वे नंबर 60 च्या जागेवर पुरुषांसाठी व महिलांसाठी जिम्नॅशियम हॉल बनविणे व जिम्नॅशियम साहित्य खरेदी करण्यासाठी 2.25 कोटी रुपये, मौजे सर्वे नंबर 60 च्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम करण्यासाठी 75 लाख रुपये असे एकूण 5 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. तसेच शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी दिलेल्या पत्रानुसार शिरपूर शहरातील करवंद नाका ते बौद्ध वाडा चौक पर्यंत डीवाईडर सह काँक्रीट रोड बनविण्यासाठी 5 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर शासनाने मंजूर केला आहे.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 35 वर्षांपासून शिरपूर वरवाडे नगर परिषद मार्फत अनेक विकास कामे करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाची ब वर्ग नगरपालिका, अनेकदा प्रथम क्रमांकाचे पुरस्कार तसेच स्वच्छता अभियानाचे अनेक पुरस्कार, 24 बाय 7 पाणीपुरवठ्याची यशस्वी योजना, शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत नियमितपणे 98 ते 100 टक्के कर वसुली, यासह अशा अनेक योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत.
आता भाईंच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या निधीतून नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे मोठ्या प्रमाणात नूतणीकरण करण्यात येणार आहे, तसेच त्याच्या सभोवतालचा परिसराचे देखील सुशोभीकरण येणार आहे. वरवाडे शिवारातील सर्वे नंबर 60 च्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिम्नॅशियन साहित्य खरेदी करून अतिशय गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असे जिम्नेशियम हॉल पुरुषांसाठी व महिलांसाठी उभारण्यात येणार आहेत.
या अतिशय महत्त्वपूर्ण विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आल्याने आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांचे शिरपूर शहरातील नागरिकांनी तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भाई व दादांचे आभार मानले आहेत.