शिरपूर साखर कारखाना बाबत मंत्रालयात काय झाली चर्चा ?

बातमी कट्टा:- सहकार मंत्री मा. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्ष खाली शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याबाबत निर्देश. डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुरावा मुळे दि 15/06/2022 रोजी 11:30 वाजता मंत्रालय मुंबई येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दालनामध्ये शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्या संदर्भात सकारात्मक बैठक पार पडली.

सदर बैठकीस मंत्री सह साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष  राजवर्धन कदमबांडे,मुख्यकार्यकारी अधिकारी धीरज चौधरी तसेच शिसाकाचे चेअरमण माधवराव पाटील, दिलीप पटेल तसेच शेतकरी संघर्ष समिती चे मोहन पाटील ,एड. गोपालसिंग राजपूत. मानव एकता पार्टी चे कल्पेशसिंह राजपूत , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिरीष पाटील , मिलिंद पाटील व मंत्रालयातील सर्वे अधिकारी वर्ग उपस्थित होते. सदर बैठकीत शिरपूर सहकरी साखर कारखाना हा दहा वर्षा पासून अत्यल्प कर्ज व मुबलक उस उपलब्द असताना राजकीय इच्छा शक्ती अभावी बंद आहे.

सदर बैठकीत धीरज चौधरी यांनी कारखान्यावर असलेल्या कर्जाबाबची माहिती दिली त्यात त्यांनी असे सांगितले कि कारखान्यावर बँकेचे २६ कोटी मुद्दल व त्यावरील व्याज असे ऐकून १०४ कोटी रुपये बँकेचे घेणे आहे.सदर कर्ज रकमेवर डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी हरकत घेतली व सदर मूळ कर्ज है कमी असून त्याच्या वर लावलेले व्याज है अवास्तव व बेकायदेशीर आहे अशे बैठकीत निदर्शनास आणून दिल.मंत्री महोदयांनी बँकेला एक रक्कमी योजने (OTS Scheme) अंतर्गत तोडगा काढून कमी करण्याचे सुचवले व बँकेने ते मान्य केले. तसेच  शेखर गायकवाड (साखर आयुक्त) यांनी हा साखर कारखाना जिल्हा बँके मार्फत भाडे तत्वावर देण्यासाठी सेन्ट्रल रजिस्टर है सुद्धा सकारात्मक आहेत व त्यासाठी लागणारा योग्य तो पाठपुरावा राज्य शासणा मार्फत करू. सदर बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी बाबत सविस्तर चर्चा झाली व योग्य तो कायदेशीर पटपुरावा करून समन्वयक तोडगा काढावा असे ठरले. मा. मंत्री मोहदयानी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्या बाबत उपस्थित कारखान्याचे संचालक व जिल्हा बँकेचे चेअरमन, शेतकरी संघर्ष समिती प्रतिनिधी यांना सकारात्मक भूमिका घेण्याचे अवाहन केले व सर्व संबधीतानी सकारात्मक प्रतिसाद दिला. मध्ये काही अडचणी आल्यास राज्य शासन मदत करण्यास तयार आहे तरी बँकेने साखर कारखाना भाडे तत्वाने देण्याची प्रक्रिया सुरु करावी असे मा मंत्री मोहदायानी सूचित केले.

WhatsApp
Follow by Email
error: