बातमी कट्टा:- शिरपूर “साखर कारखाना” बाबत आज लिखाणाची ईच्छा का झाली असावी म्हणजे ज्या गोष्टीवर कितीही बोंबा मारल्यातरी देखील “पालत्या घडीवर पाणीच अहे” असे असतांना अशा गोष्टी करायचा कशाला ? हा प्रश्न मला आला होता मात्र आज काही जेष्ठ शेतकऱ्यांची पारावर मैफिल रंगली होती आणि त्या मैफलीत “साखर कारखाना” यावर विषय चर्चा सुरु होती. खर तर या साखर कारखाना बाबतच्या आठवणी जागी होत असतांना एकीकडे त्यांना बंद साखर कारखान्याचे मोठे दुख होत असल्याचे त्यांच्या गप्पांमधून जाणवत होते.
बंद साखर कारखानामुळे त्यांच्या बोलण्यातून दुख जाणवत होते.आणि हेच दुख फक्त काही शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.त्या मैफलीत एक शेतकऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखाना सुरु करण्यात आला होता आणि या साखर कारखान्यामुळे शेतकरी नेहमी सुखी समाधानी राहत होते.मात्र साखर कारखान्याला ग्रहण लागले आणि कारखाना बंद झाला तेव्हापासून तो गोडवा कमी झाला आहे.साखर कारखान्यावर ते जे काही बोलले ते सर्व काही या अगोदर देखील अनेकदा चर्चेतून जनतेसमोर आले आहे त्यामुळे त्या विषयावर परत परत बोलणे म्हत्वाचे नाही.

शिरपूर तालुक्याचे सर्वत्र स्मार्ट सिटी,स्मार्ट शिरपूर किंवा शिरपूर पॅटर्न नावाने ओळख आहे मात्र याच तालुक्यातील शेतकऱ्यांचे काय ? त्यांच्यावर होणारे आर्थिक संकटाचे काय ? त्यांचा कोणी विचार केला आहे का ? किंवा भविष्यात देखील करणार का ? असे असंख्य प्रश्न उपस्थित होतात.
मात्र शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरु करण्यात आलेला हा साखर कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना काय त्रास झाला हे शेतकरी वर्ग अनुभवत आहेत.राजकानातील स्टार पॉईंट म्हणत याच साखर कारखान्याला सगळ्यात जास्त महत्त्व देऊन राजकारण खेळवले जाते मात्र नंतर त्या स्टार पाँईंटला मात्र कोणी ढुंकूनही बघतांना दिसत नाही.डोळ्यावर पट्टी बांधून हा रितसर राज-का-रण चा कार्यक्रम सुरु असतो. अन् पुढे देखील ग्रामीण भागातील राजकारणावेळी याच साखर कारखान्या बाबत बोलले जाईल आणि राजकारण संपेल तसा हा विषय देखील संपवण्यात येईल.
त्यामुळे तालुक्याचे स्मार्ट शिरपूर,स्मार्ट सिटी,शिरपूर पॅटर्न ज्या पध्दतीने संपूर्ण देशाला दाखवले जाते ना ! त्या पध्दीने शिरपूर साखर कारखाना पण दाखवा त्यावर तालुक्यातील शेतकरी राजांना प्रत्येक राजकारणा वेळी आश्वासन दिले जाते ते पण दाखवा ! कृषी प्रधान म्हणून देशाची ओळख असतांना याच शेतकऱ्यांचे हक्काचे संस्थाने कशा पध्दीचे बंद केले जातात हे देखील जगाला कळु द्या !