

बातमी कट्टा:-शिरपूर येथील आर सी पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचा 10 वी चा निकाल 100 टक्के लागला आहे . त्यात कु तेजल योगेश सोनार 95.60 व कु रश्मी चंद्रकांत सोनार 95.40 टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे .कु तेजल व कु रश्मी या दोघी बघिणी उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू आहेत त्या मुलींच्या अंडर 17 फुटबॉल संघात स्टेट खेळून आलेल्या आहेत . कु तेजल रेणुका ऍग्रो चे संचालक योगेश सोनार यांची कन्या व कु रश्मी ही प्रा.चंद्रकांत सोनार यांची कन्या आहे.
त्यांचा या यशाबद्दल माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल , माजी नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल , उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी , उद्योगपती चिंतनभाई पटेल , सीईओ डॉ उमेश शर्मा , पी व्ही पाटील यांच्यासह विद्यालयातील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या .
