शिरपूरात अवैध व्यवसायांवर “डोळा” कोणाचा ? अवैध व्यवसायांच्या “नेटवर्क”ला कारवाईचे सिग्नल मिळेल का ?

बातमी कट्टा:- अवैध व्यवसायीकांसाठी शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोशक वातावरण निर्माण झाले आहे. शहरात तर अवैध व्यवसायांचे मोठे नेटवर्क बनले आहे.या नेटवर्कची मात्र संबधीत विभागांना अद्याप कुठलेही सिग्नल मिळत नसणे हा म्हणजे संशोधनाचा विषय समजावा लागेल ! कारण किरकोळ कारवाई व्यतिरिक्त कुठलीही ठोस कारवाई होतांना दिसत नाही.

कोणीही अवैध व्यवसाय बंद पाडू शकत नाही असे नेहमी म्हटले जाते त्याची प्रचिती आजवर अनेकदा आलेली आहे. शहरासह तालुक्यात अवैध व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नेटवर्क बनले आहे.या नेटवर्क मधील मोठ्या माशांना सोडून किरकोळांवर कारवाई करण्यात येते असते. खुलेआम सुरु असलेल्या मोठ्या अवैध व्यवसायांवरील माशांवर कारवाई होत नसल्याने जनतेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होते.

जोर वाढलाच तर अवैध व्यवसायाकांकडूनच कारवायांसाठी माणसे पाठवण्यात येत असतात.यामुळे मुळापासून अवैध व्यवसाय रोखने शक्य होत नाही.खुलेआम सुरू असलेल्या या अवैध व्यवसायांवर कारवाई होऊ नये म्हणून तेरी चुप और मेरी चुप असे काहीसे बघावयास मिळते.या अवैध व्यवसायांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक हित संबध जोपासले जात असल्याने अवैध व्यवसायीकांसाठी पोशक वातावर निर्माण झाले आहे. या अवैध व्यवसायांवर नेमका कोणाचा “डोळा” आहे हे शोधणे गरजेचे आहे.

WhatsApp
Follow by Email
error: