
बातमी कट्टा:- शिरपूरात वाहतूक व्यवस्थेतेचे तिनतेरा झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.वाहतूक कोंडी मुळे पाचकंदील परिसरात महिलांसह नागरिक हैराण झाले आहेत.याबाबत पत्रकार म्हणून पोलीस निरीक्षक यांना संपर्क केला असता ही नगरपालिकेची जबाबदारी असल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. यावर आता शिरपूरकरांनी कोणावर भरोसा ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिरपूर शहरातील पाचकंदील आणि करवंद नाका परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमी ऐरणीवर येत असतो.आज तर चक्क पाचकंदील परिसरात खरेदी करणाऱ्या महिला मुलींना चालण्यासाठी देखील जागा राहिली नव्हती.यामुळे पाचकंदील परिसरात चालणे सुध्दा जिकरीचे झाले होते.या वाहतूक कोंडी बाबत पत्रकार म्हणून शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना फोन द्वारे संपर्क साधला असता हे काम नगरपालिकेचे आहे. तुम्ही पत्रकार आहात मग तुम्ही नगरपालिकेला विचारा असे उत्तर त्यांनी दिले.आता वाहतूक कोंडी निर्माण होत असणार तर सर्व प्रथम सर्वसामान्य माणूस पोलीसांनाच संपर्क साधेल ना ! मात्र पोलीस निरीक्षकांकडून यापध्दतीने उत्तर मिळणे म्हणजे याला काय म्हणावे ! जर हे काम नगरपालिकेचे आहे तर मग पोलीसांकडून वाहतूक पोलीसांची नेमणूक का करण्यात येत असते ? आणि पोलीस निरीक्षक यांच्या म्हणण्यानुसार जर हे काम नगरपालिकेचे आहे तर मग शिरपूर शहर पोलीसांनी ते लेखी स्वरूपात जाहीर करावे !