
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा
https://www.facebook.com/share/v/vQV2F8ZAXQGN8XRy/?mibextid=qi2Omg
बातमी कट्टा:- राजपूत समाजाचे नेते व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांची निर्घृण हत्याच्या निषेधार्थ शिरपूर तालुक्यातील राजपूत समाजाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढत प्राशासनाला निवेदन देण्यात आले.खूनाच्या आरोपींना व त्यांच्या कटातील सहभागी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा
https://www.facebook.com/share/v/vQV2F8ZAXQGN8XRy/?mibextid=qi2Omg
निवेदनात म्हटले की दि.५ रोजी राजस्थान येथील जयपुर शहरात राजपूत समाजाचे प्रमुख नेते व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे संस्थापक अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामडी यांची त्यांच्या घरात घुसुन त्यांच्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनेने राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या असुन या घटनेचा संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त होत आहे.समस्त शिरपुर तालुका व धुळे जिल्ह्याच्या वतीने घटनेचा जाहिर निषेध करत घटनेने समाज भावना व्यथित झाली असुन या खूनाच्या घटनेत तत्कालीन प्रशासन देखिल जबादार आहे असे दिसुन येत आहे.सुखदेसिंह गोगामेडी आपल्या जिवाला धोका आहे म्हणुन सुरक्षेची वारंवार मागणी केली होती मात्र त्यांना सुरक्षा न दिल्याने सदर घटना घडली आहे.यामुळे यास जाबदार असलेल्या प्रशासनाचा देखील निवेदनाद्वारे जाहिर निषेध करत या घटनेत सहभागी व या कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना जलद गती न्यायालयात केस चालवुन त्वरीत फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा
https://www.facebook.com/share/v/vQV2F8ZAXQGN8XRy/?mibextid=qi2Omg
आज दि 7 रोजी सकाळी 11 वाजता स्वर्गीय चंदन आबा वाचनालय पासून पायी मोर्चा शिरपूर तहसील कार्यालयावर आणत नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व तेथून प्रांताधिकारी कार्यालयावर मोटरसायकल रॅली काढत निषेध नोंदवून प्रांताधिकारी प्रमोद भामरे,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना निवेदन देऊन स्व.सुखदेसिंह गोगामेडी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील राजपूत समाज बांधव उपस्थित होते.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा
https://www.facebook.com/share/v/vQV2F8ZAXQGN8XRy/?mibextid=qi2Omg