शिरपूरात वाढत्या डेंग्यूला रोखण्यासाठी तरुणांचे निवेदन

बातमी कट्टा:- शिरपूर शहरासह तालुक्यात डेंग्यु सदृश आजाराने थैमान घातले आहे. तीन दिवसांपूर्वी क्रांतीनंतर येथील चिमुकल्याचा डेंग्यू सदृश्य आजारामुळे मृत्यू झाला.या वाढत्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी या मागणीसाठी शिरपूरातील तरुण पुढे सरसावले असून तरुणांकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

सध्या स्थितीत आपल्या शहरात डेंग्यु सदुष्य आजार मोठ्या प्रमाणावर थैमान घालत आपले जाळे अधिक पसरवित आहे. या आजाराचा प्रादुर्भाव शहरात मोठ्या प्रमाणात होत असुन, यात लहान बालकांचा मोठा समावेश आहे. सदर परिस्थिती अतिशय चिंताजनक असुन हा आजार रोखण्यासाठीचे प्रशासनाचे प्रयत्न कुठेतरी कमी पडतांना दिसत आहे. तरी प्रशासनाने हा विषय अतिशय गंभीर्याने घेत या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर उपाय योजना करीत लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करावे. तसेच डेंग्यु निर्मुलन पथक शहारात अधिक सक्रीय करीत घरोघरी तपासण्या सुरु कराव्यात.विविध उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे तरुणांनी केली आहे.

याबाबत शिरपूर नगरपालिकेला  नयन माळी,आशीष धाकड,नंदकिशोर राजपूत , गोलू लोहार, अक्षय राजपूत यांनी निवेदन दिले तर तालुका वैद्यकीय अधिकारी यांना सेवा फर्स्ट तर्फे हंसराज चौधरी ,पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे,चेतन मोरे,पुष्पक जैन आदींनी निवेदन दिले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: