“शिवज्योत मशाल” घेऊन 300 मावळे पायी निघाले ‘आग्रा ते राजगड’,धुळ्यात आगमन

बातमी कट्टा:- आग्रा येथून छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तूरी देऊन आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर स्वतःसह बालराजे छ. संभाजी महाराजांची सुखरूप सुटका करून घेतली या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेस तब्बल ३५६ वर्ष पुर्ण होत असून या निमित्ताने “गरूडझेप मोहीमे” अंतर्गत नरवीर पिलाजीराव गोळे (छ.शिवाजी महाराजांचे पायदळ प्रमुख) यांचे तेरावे वंशज अँड.मारूतीराव आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली ३०० मावळे हातात “शिवज्योत मशाल” घेऊन ‘आग्रा ते राजगड’ पायी चालत जात आहेत. या मशाल यात्रेचं आज दि.२४ आगष्ट २०२२ रोजी सकाळी ठिक 9:०० वाजता धुळ्यातील विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी स्मारक येथे आगमन झाले.

त्यांच्या या महान कार्यासाठी मानाचा मुजरा म्हणून सदरील मशाल यात्रेतील मावळ्यांचा येतोचित सत्कार व स्वागत विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी स्मारक समिती तथा शिवराणा ग्रुप महाराष्ट्र च्या वतीने करण्यात आले.या प्रसंगी रँलीचे प्रमुख मारोती आबा गोळे यांनी विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी स्मारकाच्या वतीने पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी अँड.मारूतीराव आबा गोळे यांचा सत्कार स्मारक समिती चे अध्यक्ष अजितदादा राजपुत यांनी केला,दिग्विजय जेडे यांचा सत्कार उपाध्यक्ष तेजपाल गिरासे यांनी तर विलास मोरे यांच्या सत्कार उपाध्यक्ष जगदीश राणा यांनी तर आप्पा कोळी यांचा सत्कार संदीप भाऊ राजपुत यांनी केला तसेच या प्रसंगी स्मारक समितीचे सचिव मनजीत भाऊ सिसोदिया, ऍड. शैलेश राजपुत, शुभम दुसाने, प्रणिल महाजन, विक्की गिरासे, पियुष अहिरे, अमर गिरासे, यश बच्छाव,कुणाल रवंदळे, निलेश मेहेंदळे, हर्षल बोरसे, प्रतिक पवार, अमित अडसुरे, तुषार बोरसे, तुषार भदाणे, प्रजय साळुंखे इत्यादी शिवराणा प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: