
बातमी कट्टा:- शिवमहापुराण कथेत लाखोंच्या संख्येने भावीकांच्या गर्दीत संधीचा फायदा घेत हातसफाई करणाऱ्या तीन पाकीटमार चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे.त्यांच्या ताब्यातून पाकीटे व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
धुळ्यातील सुरत बायपास जवळील रस्त्यालगत ख्यातनाम शिवमहापुराण कथावाचक पंडीत प्रदिप मिश्रा यांचे दि.१५ रोजीपासुन कथावाचन कार्यक्रम सुरु आहे. शिवमहापुराण कथेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असुन लाखोंच्या संखेने भाविक येथे दाखल झाले आहेत.
गर्दीचा फायदा घेवुन भाविकांच्या गळ्यातील सोन्याची माळ व पाकीटमारी होण्याची शक्यता असल्याने याबाबत संजय बारकुंड, पोलीस अधीक्षक धुळे व किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांनी दत्तात्रय शिंदे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते. त्याअनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साध्या वेशात गर्दीत राहुन संशयीतांचा शोध घेत असतांना धुळे, मालेगाव व भुसावळ येथील तीन पाकीटमार मिळुन आले.पथकाने पाकीटमार चोरट्यांकडुन चोरी केलेली पाकीटे हस्तगत केले असुन त्यांचे ईतर साथीदारांकडुन इतर पाकीटे व मोबाईल हस्तगत करण्यात येत आहेत.
वयोवृद्ध महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणारे संशयीत महिलांना विचारपुस करण्यात येत आहे. शिवमहापुराण कथेसाठी येणार्या भाविकांनी त्यांचे किंमती वस्तु चोरी होणार नाहीत याची काळजी घेणेबाबत धुळे पोलीस प्रशासणातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
