शेकडो विद्यार्थी- विद्यार्थ्यींनींचा मुक मोर्चा…

बातमी कट्टा:- धुळे जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत विद्यार्थ्यांनी मुक मोर्चा काढत भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला आहे.या मोर्चात शेकडो विद्यार्थी व विद्यार्थ्यीनी सहभाग घेतला होता.शासनाने निकाल लावले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा यावेळी प्रशिक्षार्थी विद्यार्थ्यांनी दिला आहे.

व्हिडीओ बातमी

टीईटी घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अजून एक भोंगळ कारभार समोर आला आहे. परीक्षा परिषदेने टाइपिंग व शॉर्टहँड परीक्षेचे निकाल लावलेले नाहीत तसेच प्रतीक्षेत असलेल्या मुलांची परीक्षा देखील घेतलेले नाही.नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल फेब्रुवारी महिन्यात लागणे अपेक्षित होते.मात्र अद्याप निकाल लागलेले नाहीत.राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी टाइपिंग परीक्षेचे अर्ज भरले आहेत शुल्क भरले आहेत मात्र त्यांची परीक्षा केव्हा होईल? या अद्याप कुठलेही माहित प्राप्त नाही.याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याचा आरोप कॉम्पुटर टाइपिंग व विद्यार्थी संघटनेने केला आहे. महाराष्ट्र शासनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.या भोंगळ कारभार विरोधात धुळ्यात निषेध मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.शासनाने निकाल लावले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला आहे.

व्हिडीओ बातमी
WhatsApp
Follow by Email
error: