शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात किती पीक कर्जाचे झाले वाटप…

नाशिक विभागात 4 हजार 448 कोटी 89 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप;गतवर्षी पेक्षा 10 टक्के अधिक कर्ज वाटप

पीक कर्जाचा 4 लाख 95 हजार 600 शेतकऱ्यांना होणार लाभ:- विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर

खरीप हंगामासाठी विभागातील नाशिक, जळगांव, अहमदनगर,धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्यावर्षी पेक्षा दहा टक्के अधिक पीक कर्जाचे वाटप झाले आहे. आजपर्यंत 4 हजार 448 कोटी 89 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप 22 जुलै 2021 पर्यंत झाले आहे.विभागात एकूण 47 टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ विभागातील 4 लाख 95 हजार 600 शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी दिली आहे.

खरीप हंगाम 2020-21 करिता विभागातील एकूण उद्दीष्टे 9 हजार 396 कोटी 56 लाखाचे असून त्यापैकी 4 हजार 448 कोटी 89 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. संपूर्ण विभागात आत्तापर्यंत 47 टक्क्यापर्यंत कर्जवाटपाचे काम झाले आहे. कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने 82 टक्के इतके लक्षणीय असे कर्ज वाटप केले आहे, अशी माहितीही विभागीय सहनिबंधक श्रीमती लाठकर यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात 73 हजार 230 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

नाशिक जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 2 हजार 780 कोटी रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 1 हजार 242 कोटी 35 लाख रुपयांचे वाटप झाले असून आत्तापर्यंत 45 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 73 हजार 230 शेतकऱ्यांना झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 2 लाख 23 हजार 493 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

अहमदनगर जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 3 हजार 753 कोटी 91 लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 1 हजार 874 कोटी 27 लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 50 टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 2 लाख 23 हजार 493 शेतकऱ्यांना झाला आहे.

धुळे जिल्ह्यात 30 हजार 586 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

https://m.facebook.com/batamikatta/ “बातमी कट्टा” च्या अधिकृत फेसबुक पेजला लाईक करण्यासाठी वरील लिंकला क्लिक करा…

धुळे जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 684 कोटी 99 लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 286 कोटी 17 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून आत्तापर्यंत 42 टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 30 हजार 586 शेतकऱ्यांना झाला आहे.

जळगांव जिल्ह्यात 1 लाख 48 हजार 630 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

जळगांव जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 1 हजार 614 कोटी 09 लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 815 कोटी 14 लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 51 टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 1 लाख 48 हजार 630 शेतकऱ्यांना झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात 19 हजार 661 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

नंदुरबार जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 563 कोटी 56 लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 230 कोटी 94 लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 41 टक्के झाले आहे. पीक कर्जाचा लाभ 19 हजार 661 शेतकऱ्यांना झाला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: