बातमी कट्टा:- आज दि 21 रोजी शेतकऱ्याने घराच्या छताला गळफास गळफास लावलेल्या स्थितीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडरी असून शेतीच्या नापीकीसह शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या चिंतेतून आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील शेतकरी नरेंद्रसिंग चित्रभानू गिरासे वय 40 यांनी घराच्या छताला गळफास लावलेल्या स्थितीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नरेंद्रसिंग गिरासे यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या.नरेंद्रसिंग गिरासे यांनी कोणाला काही एक न सांगता गळफास घेऊन आत्महत्या केली. नरेंद्रसिंग गिरासे यांनी शेतीसाठी बँकेतून कर्ज घेतले होते.कर्ज फेडण्याच्या अपेक्षा असतांना शेतातून उत्पन्न मिळत नव्हते.अनेक वर्षापासून शेतात येणाऱ्या नापिकी व दुष्काळाला कंटाळून शेतकरी नरेंद्रसिंग गिरासे यांनी आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
