बातमी कट्टा:- सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतात विषारी औषध प्राशन करुन 44 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि 2 रोजी घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार लामकानी येथील 44 वर्षीय चुनीलाल धर्मा सासके हे दि 2 रोजी सकाळी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.यावेळी शेता शेजारी भूषण सासके यांना चुनीलाल सासके बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले.तेथेच पिकांवर फवारणी करण्याचे विषारी रासायनिक औषधाची रिकामी बाटली आढळून आली.चुनीलाल यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टारांनी मयत घोषित केले आहे.त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की,चुनीलाल सासके यांनी सततची नापिकी,मुलींच्या लग्नाची चिंता व खासगी खर्चाच्या चिंतेतून आत्महत्या करुन जिवन प्रवास संपवल्याचे सांगण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,एक मुलगा होत.