
बातमी कट्टा:- शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शखखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून 11 पाण्याच्या मोटारी जप्त करण्यात आले आहेत.धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा, सोनगीर शिंदखेडा परिसरातून चोरी या मोटारी चोरण्यात आल्याचे उघड झाले आहे.

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ झाली होती.धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या चोरट्यांचा छडा लावत, तब्बल 11 पाण्याच्या मोटारीत जप्त करण्यात आले आहेत.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या पथकाने कारवाई केली असून या कारवाईत पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील दोन संशयित हे अल्पवयीन आहेत.पोलिसांनी जप्त केलेल्या मोटारी या सर्व महागड्या किंमतीच्या असून, दोंडाईचा, सोनगीर, शिंदखेडा या परिसरातून त्यांची चोरी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
शेतातून मोटारीत चोरी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. पोलिसात तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने, अनेकांनी तर याबाबत विचारणा करणे देखील बंद केले होते. मात्र स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, चोरीला गेलेल्या मोटारीत परत मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.