शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत इंजिनिअरचा मृत्यू…

बातमी कट्टा:- शेतीच्या वादातून शेतात झालेल्या हाणामारीत 28 वर्षीय तरुण इंजिनिअरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घढली आहे.या घटनेत मृत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन काका,काकू दोन चुलत भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महारहाणीत उमेशला मार लागल्याने त्याचे पोटात त्रास होत असल्याने पोलीस स्टेशनात तक्रार करणयासाठी गेले असता पोलीसांनी उमेशला उपचारासाठी दाखल होण्यासाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी सांगितल्याने रुग्णालयात दाखल केले मात्र जास्त त्रास होऊ लागल्याने उमेश याला जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यावेळी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उमेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्याच्यावर दि 13 रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे गुरुवारी सकाळी सुनीता महाजनसह त्यांचे पती आबा महाजन मुलगा नीलेश व उमेश शेतात जाण्यासाठी निघाले असतांना ते सामाईक हिश्शावरील शेताजवळ पोहचले.यावेळी तुकाराम महाजन,उषाबाई महाजन ,मनोज,सुररेश महाजन,अनिल महाजन तेथे आले.यावेळी तुकाराम महाजन आणि मनोज यांच्या हातात लाकडी दांडके होते.तर उषाबाई यांच्या हातात खुरपे होते.यावेळी तुकारामने तुम्ही शेतात पाय ठेवायचा नाही व शेत जूप करण्यासाठी मागायचे नाही असे धमकावले व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यावेळी मुलगा उमेश त्यांना समजावून सांगत असतांना तुकाराम महाजन व मनोज यांनी त्यांच्या हातातील दांडके उमेशवर उगारले यांचा लहान मुलगा नीलेश याने मनोज याच्या हातातील दांडके धरण्याचा प्रयत्न करतांना त्या दांडक्याचा मार निलेशला लागला तसेच तुकाराम याने त्याच्या हातातील दांडके उमेशला मारले.त्यावेळेस ऊषाबाई याच्या हातातील खुरपे घेवून मागुन धावत येऊन जिवंत सोडू नका असे बोलू लागली.यावेळी सुरेश महाजन,अनिल महाजन यांनी उमेशला जमिनीवर खाली पाडून तुकाराम महाजन,सुरेश ,अनिल आदींनी लाथाबुक्यांनी उमेश यास पोटावर गुप्तभागावर जोरजोरात मारहाण करीत असतांना सुनीता महाजन,आबा महाजन,मुलगा निलेश आदींनी उमेशला त्यांच्या तावडीतून सोडवले.

उमेश हा औरंगाबाद येथे सोफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता.मयत उमेशची आई सुनीता महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेठ तुकाराम भगवान महाजन,जेठाणी उषाबाई तुकाराम महाजन,पुतण्या मनोज तुकाराम महाजन, मोठे जेठ सुरेश भगवान महाजन,पुतण्या अनिल सुरेश महाजन आदींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: