शिरपुर तालुक्यातील हिसाळे येथे शेतीच्या वाद झालाचा याबाबत परस्पर विरोधी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. यात 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथे शेतीच्या वादातून हाणामारी झाली आहे या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन येथे परस्पर विरोधी चार तक्रारी दाखल करण्यात आले आहेत. यात 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हि संपूर्ण हाणामारीची घटना मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे.याबाबत पोलीसांकडून कारवाई सुरु असून या हाणामारीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.