शॉक लागून तरुणाचा मृत्यू…!

बातमी कट्टा:-शेतात पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी इलेक्ट्रीक बोर्डाजवळ गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी घडली. 8 महिण्यापुर्वीच लग्न झालेल्या तरुणाचा शॉक लागू मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील राहुल उर्फ गोलु शाम पाटील वय 23 हा तरुण शेतकरी आज सायंकाळी शेतात गेला होता.यावेळी शेतात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी इलेक्ट्रीक बोर्डला हात लावताच त्याला जोराचा शॉक लागला.शॉक लागल्याने राहुल पाटील खाली पडला.त्याला उपस्थितांनी तात्काळ गावातील रुग्णालयात नेले मात्र गंभीर परिस्थिती असल्याने शिरपूर इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल केले व तेथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी राहुल पाटील याला मृत घोषीत केले.

राहुल पाटील याचे 8 महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. सर्व काही सुखी समाधानी सुरु असतांना कुटुंबावर काळाने घाला घातला.राहुल पाटीलच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ व बहिण असा परिवार होत.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: