बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील संत सावता महाराज चौक, वरचे गाव, रथ गल्ली येथे श्री संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त किर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला असून बुधवारी २० जुलै रोजी गाथा, विठु रखुमाई, सावता महाराज यांच्या मूर्तिंची मिरवणूक सोहळा संपन्न होत आहे.
संत सावता महाराज चौक, वरचे गाव, रथ गल्ली येथील माळी समाज मंगल कार्यालया पासून समाज बांधव, परिसरातील नागरिक, महिला, पुरुष, युवा वर्ग यांच्या उपस्थितीत बुधवारी २० जुलै रोजी सकाळी ८ वाजता गाथा, विठु रखुमाई, सावता महाराज यांच्या मूर्तिंची मिरवणूक काढण्यात येत आहे.
तसेच आषाढ कृ || ८|| गुरुवार दि. २१ जुलै २०२२ रोजी किर्तन सप्ताहाचा शुभारंभ होत असून आषाढ दर्श अमावस्या गुरुवार दि. २८ जुलै २०२२ रोजी समारोप होणार आहे. दररोज सकाळी ६ वाजता हरिपाठ, सायंकाळी ८ ते १० वाजेपर्यंत किर्तन होईल. गुरुवार २१ जुलै रोजी कीर्तनकार श्री. ह. भ. प. मधु माऊली वडगावकर यांचे कीर्तन, शुक्रवार २२ जुलै रोजी श्री. ह. भ. प. मनोज महाराज ऐनगावकर, शनिवार २३ जुलै रोजी श्री. ह. भ. प. रविंद्र महाराज तारखेडकर, रविवार २४ जुलै रोजी कुमारी ह. भ. प. साक्षीताई मुळे (माळी) जालना, सोमवार २५ जुलै रोजी श्री. ह. भ. प. श्रीराम महाराज उंटावदकर, मंगळवार २६ जुलै रोजी श्री. ह. भ. प. वाल्मिक महाराज ब्राह्मणगावकर, बुधवार २७ जुलै रोजी श्री. ह. भ. प. अतुल महाराज नारणेकर, गुरुवार २८ जुलै रोजी दर्श अमावस्येच्या दिवशी श्री. ह. भ. प. पांडुरंग महाराज मालपुरकर यांचे कीर्तन तसेच सकाळी ९.३० ते १२ वाजेपर्यंत काल्याचे किर्तन होईल. बुधवारी २७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता श्री संत सावता महाराज मंदिर मळ्यापासून श्री संत सावता महाराज यांची पालखी मिरवणूकीस प्रारंभ होईल. तसेच गुरुवारी २८ जुलै रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत श्री संत सावता माळी भवन, माळी समाज मंगल कार्यालय, रथ गल्ली वरचे गाव येथे महाप्रसाद भंडारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त माळी समाज, वरचे गाव व श्री संत सावता माळी भजनी मंडळ, रथ गल्ली वरचे गाव शिरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.