संक्रांतीच्या दिवशी तरुणाची तापीत आत्महत्या

बातमी कट्टा:- ऐन सणासुदीच्या दिवशी 26 वर्षीय तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि 14 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील वाल्मिक नगर येथे राहणारे रहिवासी जगदीश कोळी वय 26 याने आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास सावळदा तापी नदीपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.जगदीश कोळी याने तापी पात्रात उडी घेतल्याचे माहिती मिळताच वाल्मीक नगरातील रहिवाशांनी तापी नदीकडे धाव घेत मच्छिमारांनी शोधकार्य सुरू केले.यावेळी जगदीश कोळी याचा मृत्यूदेह अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर मच्छीमारांना मिळुन आला.जगदीश कोळी याचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ अमोल जैन यांनी जगदीश कोळी यास मयत घोषित केले. मयत जगदीश ट्रान्सपोर्टवर हमालीचे काम करत होता.दहा महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होते काही दिवसापूर्वी त्याचा मोठा भाऊ देखील अपघातात मृत्यू झाला होता.

WhatsApp
Follow by Email
error: