बातमी कट्टा:- शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे नगरसेवक चंदनसिंग राजपूत यांचे आज दि 2 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास निधन झाले.सायंकाळी 7 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. शिरपूर नगरपालिकेत सलग दोनदा नगरसेवक म्हणून ते निवडून गेले होते.नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक पणे आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी म्हणून ते प्रसिद्ध होते.माजी खासदार कै.शिवाजीराव दादा पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले चंदन आबा विविध सामाजिक उपक्रमात आघाडीवर होते.नेताजी प्रतिष्ठान मार्फत रुग्णवाहिकेसह विविध उपक्रम त्यांनी राबवले.राजपूत समाजाचे कुशल संघटक असलेल्या चंदन आबांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा,दोन भाऊ असा परिवास आहे.नेताजी केबल व इंटरनेट सेवा प्रतिष्ठानचे ते संचालक होते.कै.चंदन आबांना बातमी कट्टा पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली !!