संतप्त दिव्यांग आंदोलकांचा गटविकास अधिकारींच्या दालनात ठिय्या आंदोलन,आंदोलकांनी स्वताला कोंडून घेत केला निषेध व्यक्त…

बातमी कट्टा:- प्रहार अपंग क्रांती संस्था आंदोलनाच्या वतीने आज दि 22 रोजी सकाळी 11 वाजेपासून शिरपूर पंचायत समिती कार्यालय समोर बिर्हाड आंदोलन सुरु असतांना संबधित अधिकारींनी आंदोलकांची दखल न घेतल्याने संतप्त दिव्यांग आंदोलकांनी गटविकास अधिकारी कार्यालयाच्या दालनात प्रवेश करुन स्वताला कोंडुन घेतले व घोषणा देत दालनात खाली बसून ठिय्या आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.काही वेळेनंतर गटविकास अधिकारी यांनी दालनात प्रवेश करत समस्या जाणून घेऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.दिव्यांगांची नोंदणी त्यांच्या अपंगत्वाप्रमाणे ग्रामपंचायतीत करुन त्यांना 3 टक्के व 5 टक्के निधी व इतर योजना त्वरीत द्यावी यासाठी दिव्यांगांकडून आंदोलन करण्यात आले होते.

शिरपूर पंचायत समिती समोर आज प्रहार अपंग क्रांती संस्था आंदोलनाच्या वतीने बिर्हाड आंदोलन करण्यात येत होते. प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र राज्य खजीनदार कविता पवरा व प्रहार अपंग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष सशीकांत सुर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात सुरु होते. मात्र पंचायत समिती समोर सुरु असलेल्या आंदोलकांकडे संबधीत अधिकारींनी ढुंकूनही बघितले नसल्याने संतप्त दिव्यांग आंदोलकांनी घोषणा करत थेट पंचायत समितीचे दालनात प्रवेश करुन आतून कडीकोंडा लावून स्वताला कोंडून घेतले होते.काही वेळानंतर गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे गटविकास अधिकारी कार्यालयात दाखल होऊन आंदोलकांना सजविण्याचा प्रयत्न केला.

तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडव्याचे प्रयत्न करण्यात आले.यावेळी आंदोलकांमध्ये आणि अधिकारींमध्ये शाब्दिक चकमक झाली.एक तास आंदोलकांनी गटविकास कार्यालयात दालनात ठिय्या आंदोलन करीत बसून निषेध व्यक्त करीत होते.यानंतर गटविकास अधिकारी यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याबाबत विंनती करत तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीने दिव्यांगसाठी केलेला खर्चाचा अहवाल दाखवून उर्वरित ग्रामपंचायतीचा दि 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत खर्च केलेला अहवाल देण्यात येईल व ज्या ग्रामपंचायतींनी निधी खर्च न केल्यास ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे पत्र देण्यात आले.

दिव्यांग आंदोलकांचे निवेदनानुसार शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात असलेल्या दिव्यांगांची ,त्यांच्या अपंगत्वा प्रमाणे ताबडतोब नोंदणी दिनांक 24 सप्टेंबर 2013 च्या जी.आर.नुसार होवून त्यांना शासकीय व निमशासकीय मिळणाऱ्या योजनेचा लाभ देण्यात यावा,तसेच 1995 च्या अपंग पुर्नवसनेच्या कायद्यानुसार अपंगांचा 5 टक्के निधी देण्यात यावा.तसेच आता दि 28 एप्रिल 2016 रोजीच्या जी.आर.नुसार अपंगांचा निधी अपंगांच्या खात्यात जमा करावा,तसेच 200 स्के्अरफुट गावठाण जागा अपंगाला व्यवसायाकरिता देण्यात यावी. तसेच इतरही लाभ दिव्यांगांना देण्यात यावे याकरिता शिरपूर तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्या सोबत सर्व ग्रामसेवकांची बैठक घेण्यात येवून त्याबाबत प्रहार अपंग क्रांती संस्था आंदोलकांना दि 18-10-2021 रोजी पर्यंत सदरील माहिती देण्यात यावी अन्यथा दि 21 ऑक्टोबर पासून शिरपूर पंचायत समिती येथे बिर्हाड आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता.

दिव्यांग आंदोलकांनी गटविकास दालनात प्रवेश करुन स्वताला कोंडून घेत ठिय्या आंदोलन केले.त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास गटविकास अधिकारी यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याबाबत विंनती करत तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीने दिव्यांगसाठी केलेला खर्चाचा अहवाल दाखवून उर्वरित ग्रामपंचायतींचा दि 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत खर्च केलेला अहवाल देण्यात येईल व ज्या ग्रामपंचायतींनी निधी खर्च न केल्यास ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे पत्र दिले.पत्र स्विकारून दिव्यांग आंदोलकांनी आंदोलनास स्थगिती देण्यात आली.

WhatsApp
Follow by Email
error: