संभाजी भिडे(गुरुजी) आज धुळे जिल्हा दौऱ्यावर, शिरपूरात सायंकाळी व्याख्यान…

बातमी कट्टा:- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिड़े (गुरुजी) आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असून धुळ्यात हिंदू सहाय्यता कार्यालयाच्या उद्घाटनासह साक्री आणि शिरपुरात व्याख्यानमालेस ते संबोधित करणार आहेत.

संभाजी भिडे (गुरुजी) आज गुरुवारी सकाळी साक्री येथे दाखल होऊन साक्री येथील कार्यक्रम आटोपून १:३० वाजता धुळे येथे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष संजय शर्मा यांच्या पाचकंदिल येथील वास्तूत ‘श्री रायगड’ नावाने हिंदू सहाय्यता कार्यालयचे उदघाटन करण्यात करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत शिरपूर येथे दाखल होऊन शिरपूरात मनोमंगल लॉन्स येथे त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: