बातमी कट्टा:- सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे शिरपुर तालुकाध्यक्ष पदी बोरगाव ता शिरपुर जि धुळे येथील उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांची नियुक्ती सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील व राज्य सोशल मिडीया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, संपर्क राज्य प्रमुख राहुल उके यांनी केली.

सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य ही सरपंच यांचे न्याय, हक्क व मागणीसाठी राज्यभर कामकाज करणारी नोंदणीकृत सरपंच संघटना आहे. संघटनेने शासन दरबारी केलेल्या सरपंच मानधनवाढ सारख्या अनेक मागण्या मान्य झालेल्या आहेत.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या निवडी बद्दल माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, भुपेशभाई पटेल, जि प अध्यक्ष डॉ तुषार रंधे, अशोक कलाल, प्रभाकर चव्हाण, कृऊबा सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, युवा नेते चिंतनभाई पटेल, बोराडी चे उपसरपंच राहुल रंधे, शिसाका संचालक भरत भिलाजी पाटील, मा पं स उपसभापती जगतसिंग राजपूत यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य सोशल मिडीया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, राज्य संपर्क प्रमुख राहुल उके, राज्य महीला उपाध्यक्ष वंदनाताई गुंजाळ, सरपंच माझा चॅनल संचालक रामनाथ बोराडे, धुळे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष सचिन राजपूत यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.