
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात बॅनर फाडल्याचणी या वादातून दोन गटात धुमश्चक्री झाल्याची घटना 10 रोजी दुपारी घडली होती.दंगलीनंतर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता यावेळी शांततेचे आवाहन करण्यासाठी गेलेले भाजपचे आमदार काशीराम पावरा, तहसीलदार महेंद्र माळी व पोलिसांच्या वाहनावर जमावाकडून दगडफेक करत वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.या घटनेत तीन पोलीस अधिकारी आणिपोलीस कर्मचारींसह तहसीलदारांचे वाहनचालक जखमी झाले होते.यात 150 ते 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले होते.सुरवातीला या प्रकलणात 13 संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते.याप्रकरणी आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी शिवसेना तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा आणी काँग्रेसचे पदाधिकारी रमेश वसावे यांना शनिवारी अटक करणली आहे.

सांगवी परिसरात 9 ऑगस्ट ला विश्व आदिवासी दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापुरुषांच्या प्रतिमा असलेले फलक देखील लावण्यात आले होते. दहा ऑगस्टला दुपारी त्यापैकी एक फलक फाडल्याचे वृत्त गावात पसरले आणि वातावरण तणावपूर्ण झाले.बॅनर फाडल्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेला गट व दुसरा गट यांच्या दरम्यान दगडफेक झाली. लाट्या-काठ्यांचा वापरही झाला.त्यात काही जण जखमी झाले. त्यापैकी सुभाष विजय सोनवणे (वय 26), नितीन लक्ष्मण भिल (वय 18) व शिवदास आसाराम भिल (वय 40, तिघे रा. सांगवी) यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यात एक गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावय धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले होते.
या घटनेनंतर संशयीतांवर कारवाई करावी या मागणीसाठी जमावातील युवकांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला होता.यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक तीन तासभर खंडित झाली होती.दरम्यान दंगलीनंतर शांततेचे आवाहन करण्यासाठी घटनास्थळी गेलेले आमदार काशीराम पावरा,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, तहसीलदार महेंद्र माळी यांच्या वाहनासह पोलीसांच्या वाहनांवर जमावाने दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली होती.
याप्रकरणी पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणात धडपकड सुरु होती सुरुवातीला पोलीसांनी 13 संशयितांना ताब्यात घेतले होते.त्यानंतर पोलीसांकडून संशयितांची धरपकड सुरू असतांना दंगलीच्या घटनेच्या दोन महिन्यानंतर पोलीसांनी शुक्रवारी शिवसेना तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा आणि शनिवारी काँग्रेसचे माजी पदाधिकारी रमेश वसावे यांना अटक करण्यात आहे.