सांगवी प्रकरणात आदिवासींवरील गुन्हे मागे घ्या- बिरसा फायटर्स व आदिवासी विकास परिषदची मागणी

बातमी कट्टा:- शिरपूर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील दंगलीनंतर मराठा आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहिर केला. त्याच न्याय सिद्धांतांवर शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे आदिवासी क्रांतिवीरांचे बॅनर फाडल्यानंतर झालेल्या उद्रेकानंतर दाखल झालेले आदिवासी युवकांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी बिरसा फायटर्स, आदिवासी विकास परिषदने तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली व महाराष्ट्र, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, आयुक्त, अपर मुख्य सचिव, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून ऊसळलेल्या दंगलीत मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मुख्यमंत्री यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे तालुक्यातील सांगवी येथे 10 ऑगस्टला चारण समाजातील लोकांनी आदिवासी क्रांतिवीरांचे बॅनर फाडले होते. सदर बाब आदिवासी समाजातील लोकांना समजल्यावर आदिवासी समाजातील लोकांनी विचारणा करण्यास गेलेल्या युवकांवर चारण समाजातील लोकांनी जीवघेणा हल्ला केला. सदर घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिक सांगवी येथे जमू लागले. सायंकाळी आदिवासी समाज NH-3 वर रस्ता रोको करत आदिवासी क्रांतीविरांचे बॅनर फाडून क्रांतीविरांचे विटंबना करणाऱ्या व मारहाण करणाऱ्या चारण समाजातील लोकांवर ॲट्रोसिटी व त्यांना अटक करण्याची मागणी करू लागला. दरम्यान पोलीसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. तरी देखील आरोपींना अटक करण्याच्या मागणीवर आदिवासी समाज ठाम होता. तदनंतर पोलीसांच्या लाठीचार्जनंतर दंगल ऊसळली आणि 150-200 आदिवासी युवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले गेले आहेत.

ज्याप्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच न्याय सिद्धांतावर सांगवी घटनेतील आदिवासी युवकांवरील दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी बिरसा फायटर्स, आदिवासी विकास परिषदने निवेदनातून केली.

यावेळी निवेदन देताना अध्यक्ष नाशिक विभाग विलास पावरा बिरसा फायटर्स, जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, युवा महासचिव ॲड. दारासिंग पावरा आदिवासी विकास परिषद, पिंटू भील, दिनेश भील, दादा भील, ज्ञानेश्वर भील, सागर भील, सागर मोरे, मोतीराम भील, प्रकाश बोरसे, अंकुश भील, उदय भील, बापू भील आदी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: