बातमी कट्टा:- काही दिवसांपासून ऊसाला आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.विशेष म्हणजे उन्हाचे प्रमाण वाढल्यानंतर धुळे जिल्ह्यात ऊसाला आग लागल्याचे प्रमाण देखील वाढले आहे. शिरपूर तालुक्यातील बाभुळदे शिवारात आगीने रौद्ररूप धारण केले होते तर आज पुन्हा 7 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

शिरपूर तालुक्यातील बाभुळदे शिवारातील 12 ते 15 एकरातील ऊसाला आग लागल्याची घटना काव दि 18 रोजी घडली असतांनाच आज दि 19 रोजी भरदुपारी विजेच्या शॉर्टशर्कीट मुळे 7 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.शिरपूर तालुक्यातील जातोडे येथील सत्तरसिंग रामसिंग राजपूत यांच्या मालकीचे बोरगाव शिवारातील 7 एकर ऊसाला विजेच्या शॉर्टशर्कीट मुळे आग लागली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने 7 एकरातील ऊस जळून खाक झाला.घटनास्थळी शिरपूर येथील अग्निशमन बंब दाखल होत आग विझविण्यात आली.
