
बातमी कट्टा: दि ४ रोजी पळासनेर अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.या घटनेत पळासनेर गावाजवळील कोळसापाणी या पाड्यातील 5 जणांचा मृत्यू झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र पवार व उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांच्यासह संपूर्ण महामार्ग पोलीस शिरपूर अमलदारांच्या वतीने कोळसापाणी गावाला सामाजिक बांधिलकी म्हणून एक लाखांची आर्थिक मदत करण्यात आली होती.चांदणीला जास्तीत जास्त कशी मदत मिळेल याकडे उपनिरीक्षक नरेंद्र पवार लक्ष देत असून सायकल बँकच्या माध्यमातून चांदणीला सायकल देण्यात आली आहे.


महामार्ग पोलीस शिरपूरचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पवार यांनी
नीपघातात कोळसापाणी येथील चांदणी पिंटु पावरा हिच्या आईच्या नावाने शिरपूर भारतीय पोस्ट खात्यात चांदणीच्या नावे 51 हजारांची रक्कम पाच वर्षाच्या मुदतीवर ठेवण्यात आली तर या अपघातात बबीता पावरा हिचे वडील आणि भाऊ यांचा मृत्यू झाल्याने बबीताच्या नावे देखील भारतीय पोस्ट खात्यात 30 हजारांची रक्कम पाच वर्षाच्या मुदतीसाठी ठेवण्यात आली. गावात चौथी पर्यंतच शाळा असल्याने माध्यमिक शिक्षणासाठी पळासनेर येथे किंवा आश्रम शाळेत शिक्षण घ्यावे लागते.
यात चांदणी पावरा ही चौथी इयत्तेत शिक्षण घेत असून तिला पुढील शिक्षणासाठी माध्यमिक शाळेत तिच्या गावापासून पायी प्रवास करावा लागणार होता. शिरपूर महामार्ग पोलिस प्रभारी नरेन्द्र पवार यांन ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान,कुरखळीचे अध्यक्ष योगेश्वर मोरे यांच्या कडे चर्चा केली, लागलीच योगेश्वर मोरे यांनी युवक मित्र परिवार संस्थेचे प्रवीण महाजन यांच्याकडे मागणी नोंदवून घटनेची माहिती दिली, त्यांनी सायकल बँक उपक्रम महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून सायकल उपलब्ध करून दिली. रविवारी सकाळी महामार्ग पोलीस शिरपूर प्रभारी नरेंद्र पवार यांच्या सह ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान, कुरखळी चे अध्यक्ष योगेश्वर मोरे,साई स्वाद हॉटेल चे संचालक अरविंद राजपूत,कोळसापाणी येथे जावून चांदणी पावरा हिला ग्रामस्थांच्या उपस्थितीत सायकल देण्यात आली.
युवक मित्र परिवार संस्थेच्या माध्यमातून प्रविण महाजन हे राज्यभरात सायकल बँक, वाचन चळवळ, शाळा तेथे कॉम्प्युटर लॅब अशा अनेक उपक्रमातुन राज्यभर काम करतात. यावेळी ग्रामस्थांनी महामार्ग पोलिसांचे व युवक मित्र परिवार चे प्रविण महाजन यांचे आभार मानले.
- प्रवीण महाजन
सायकल बँक उपक्रम.पुणे
वंचित आणि गरजु विद्यार्थिनीस सायकल भेट देतांना खरोखर आनंद होत असून मनाला समाधान लाभले आहे. खानदेश विभागातील गरीब व वंचित विदयार्थ्यांच्या, गावापासुन लांब असलेल्या शाळांनी सायकल मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करत आहोत.