साहेब ! त्यांची बदली रद्द करा !! ग्रामस्थांची मागणी…

बातमी कट्टा:- शासकीय कर्मचारीच्या कामातील प्रामाणिकतापणा राहिला तर आम जनता नेहमीच त्यांच्या सोबतच असतात.असेच एक उदाहरण धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील ग्रामसेवका सोफत घडले आहे.

झाले असे की,शिरपूर तालुक्यातील दहिवद गावात ग्रामसेवक योग्य पध्दतीने काम करत नाही नेहमीच गैरहजर राहत असतो अशा नेहमी तक्रारी वरीष्ठ लोकांना प्राप्त होत होत्या.वरीष्ठांनी तेथे ग्रामसेवक (ग्रामविस्तार अधिकारी पी.जे मोरे यांची नेमणूक दहिवद गावासाठी करण्यात आली.त्यांच्या कामाची पध्दत गावातील जनतेला आवडली.मात्र योग्य पध्दतीने काम करणाऱ्या ग्रामविस्तार अधिकारी पी.जे.मोरे यांची बदली होत असल्याचे गावातील नागरिकांना समजले.गावात सुरु असलेल्या ग्रामसभेत नागरिकांनी अधिकारी पी.जे.मोरे यांची बदली होऊ नये म्हणून ठराव करण्यात आला.त्यांची बदली रद्द व्हावी यासाठी नागरिकांसह सदस्यांनी केल्या.

कार्यतत्पर अधिकारी गावासाठी किती महत्वाचा असतो याचे महत्त्व पटवून गावातील ग्रामपंचायत सदस्य मयुर राजपूत यांच्यासह ग्रामस्थांनी गटविकास अधिकारींना निवेदन दिले.आणि ग्रामविस्तार अधिकारी पी.जे.मोरे यांची बदली रद्द करण्याची विनंती केली.सर्वत्र ग्रामसेवक काम करत नसल्याचे सांगत बदलीचे निवेदन देतांना आपण बघत असतो मात्र दहिवद ग्रामस्थांनी केलेली मागणी चर्चेचा विषय ठरत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: