बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी एटीएम मशीनवर डल्ला मारला आहे.एटीएम मशीन फोडून रोख रक्कम पळवली तर दुसऱ्या ठिकाणी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील फागणे येथील एचडीएफसी एटीएम मशीन गैस कट्टरने फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले मात्र येथुन दरोडेखोरांना चोरी करणे शक्य झाले नाही. परंतू सोनगीर जवळील कापडणे गावातील मुख्य चौकात असलेल्या इंडिकॅश टाटा प्रोटक्ट एटीएम मशीन फोडून 5 लाखांपेक्षा जास्तीचे रोख रक्कम चोरी करण्यात दरोडेखोर यशस्वी झाले आहेत.कापडणे येथे दरोडेखोरांनी एटीएम मशीनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला स्प्रे मारल्यानंतर चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीस प्रशासनासह फ्रिंगर प्रिंट, श्वान पथक दाखल झाले असून चौकशी सुरु आहे.