बातमी कट्टा:- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वत्र फटाके फोडून दिवाळीचा उत्सव साजरा होत असतानाच,एका तेरा वर्षीय मुलाने फटाके फोडत असतानाच स्टीलच्या ग्लासमध्ये फटाका फोडल्याने, फटाका फुटताच या ग्लासचे तुकडे होऊन या मुलाच्या शरीरामध्ये या ग्लासचे बारीक बारीक झालेले तुकडे शिरल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळ्यातील नवीन भिलाटी परिसरा रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान सोनू जाधव या तेरा वर्षीय मुलाने सुतळी बॉम्ब नावाचा फटक पेटवून त्यावर स्टील ग्लास ठेवल्याने पेटलेला फटाक्याचा बार झाल्यानंतर या ग्लासचे तुकडे हवेत वेगाने उडाले, व या तुकड्यांपैकी काही तुकडे सोनूच्या अंगात देखील घुसले व त्यानंतर सोनू थोडा अंतर चालून जमिनीवर कोसळला, नातेवाईकांनी त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु, डॉक्टरांनी सोनुला मृत घोषित केले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.