स्व.डॉ प्रेमसिंग गिरासे यांना न्याय मिळायलाच पाहिजे, शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाजातर्फे निवेदन..

बातमी कट्टा:– दराणे येथील 21 वर्षीय तरुण डॉ प्रेमसिंग गिरासे यांचा चिमठाणे ते सोनगीर रस्त्यावर खून करण्यात आला होता. घटनेनंतर पोलीसांनी संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले.त्या संशयितांना कठोर शिक्षा व्हावी तसेच हत्येचा गुन्हा फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा व यासाठी वकील उज्वल निकम यांची शासनाने नियुक्ती करावी अशी मागणी करत शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाज तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

व्हिडीओ वृत्तांत

शिरपूर तहसीलदार आबा महाजन यांना आज दि 13 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाजातर्फे निवेदन देण्यात आले.त्यात म्हटले की, शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील स्व डॉ प्रेमसिंग गिरासे यांचे आई-वडील मोलमजुरी करणारे आहेत. घरात एक लहान बहिण आहे.घराची परिस्थिती हलाखीची आहे. डॉ प्रेमसिंग गिरासे यांच्यावर घराचे पुढील भविष्य अवलंबून होते मात्र माथेफिरुने संशयितांनी त्यांचा खून केला.यामुळे शासानाने ह्या कुटुंबाला शासनाच्या विविध योजने मार्फत मदत करावी अशीही मागणी करण्यात आली.

On Youtube

डॉ प्रेमसिंग गिरासे यांचा खून करणारे संशयित हे सराईत गुन्हेगार आहेत.गुजरात येथील सुरत येथे विविध गुन्ह्यामुळे ते संशयित हद्दपार झाले आहेत.अशा माथेफिरुंना फाशीची शिक्षा देत सदर गुन्हा फास्टट्रॅक मा.न्यायालयात चालवावा व
त्यासाठी जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती शासनाने करावी अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.निवेदन देतांना तालुक्यातील राजपूत समाजातील जनसमुदाय उपस्थित होता.

WhatsApp
Follow by Email
error: