बातमी कट्टा:- कापसाचे गाठी घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रकला अज्ञात वाहनाने कट मारल्याने ट्रकचा तोल जाऊन रस्त्याच्या बाजूला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली ट्रक पलटी होणार असल्याचे लक्षात येताच अपघातात स्वताचा जिव वाचविण्यासाठी ट्रक खाली उडी मारणाऱ्या क्लिनरच्या अंगवारच ट्रक पडल्याने क्लिनरचा मृत्यू झाला.क्रेनच्या साहाय्याने ट्रकला उचलून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

शिरपूर-चोपडा रस्त्यावरील हिसाळे गावाजवळ चोपड्याकडून शिरपूरच्या दिशेने जाणारा ट्रक क्र.GJ03 एटी 0428 या ट्रकचा समोरुन येणार्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने रस्त्याच्या डाव्या बाजुस ट्रक पलटली झाला यात ट्रकचा क्लिनर भारत ( पुर्ण नाव माहित नाही ) वय २२ याचा ट्रकखाली दबल्याने जागीच मृत्यू झाला आहे.वाहन चालक दिनेश मोहन ठाकूर वय ५१ याने दिलेल्या माहितीनुसार ट्रकमध्ये कापूस गाठीचा उंच लोड घेऊन जाणाऱ्या ट्रकला समोरील अज्ञात वाहनाने कट मारला या ट्रकचा डाव्या बाजूस झोल जावून ट्रक पलटी होत असल्याचे लक्षात आहे येताच क्लिनर भारत ने स्वाताला वाचविण्यासाठी ट्रक खाली उडी मारली.मात्र नियतीला हे मान्य नव्हते कारण उडी मारताच लगेच त्याच्या भारतच्या अंगावर ट्रक पलटी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.अपघाताची घटना समजताच थाळनेर पो.स्टे.चे सपोनि उमेश बोरसे,पोउनि नवनाथ रसाळ घटनास्थळी दाखल झाले.ट्रकखाली दाबलेले मृतदेह काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली.उपस्थित ग्रामस्थांकडून मदत कार्य करण्यात आले.
