
बातमी कट्टा:- आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली दि २६ रोजी दुपारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी आमदार जयकुमार रावल यांना सोडुन शरद पवार गटात गेलेले कामराज निकम आणि ललित वारुडे यांच्या विरोधात सभापती नारायण पाटील यांनी भाषणातून चांगलाच संताप व्यक्त केला.
नारायण पाटील आपल्या भाषणात म्हणालेत की आमदार जयकुमार रावल यांनी अनेक कार्यकर्ते घडवले आणि वाढवले आहेत.आमदार रावलांनी कामराज निकम आणि नारायण पाटील दोघांवर प्रेम केले.मात्र कामराज निकम यांनी आमदारांच्या पाठीत खंजीर खुपसला.हे तर कांडराज असून जयकुमार रावलांपासून जनतेला दुर ठेवण्याचा कांड त्यांनी केला. आमदार जयकुमार रावलांनी यापुढे आपल्यात कोणाला कांडराज होऊ देऊ नये, एका महिन्यात आमदार जयकुमार रावलांचा विकास हे विसरलेत. लवकर श्रीमंत झाले लवकर फकीर होतील,सर्वांचे कांड केले.मुलांना संस्कार द्या अन्यथा वाईट दशा बघायला वेळ लागणार नाही. यासोबतच ललित वारूडे यांना उद्देशून बोलतांना नारायण पाटील पुढे म्हणालेत की,ललित वारूडे को करारा जबाब देंगे हम भी दगडी चाळ वाले आहे.अब बराबर गेम करेंगे असे यावेळी नारायण पाटील यांनी सांगितले.