हिसाळे वि.का.सोसायटी निवडणूकीच्या चुरशीच्या लढतीत कोणी मारली बाजी…?

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील हिसाळे वि.का.सहकारी सोसायटीची निवडणूक चुरशीची झाली असून या चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारेल याकडे गावाचे लक्ष लागले होते.सदर निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असतांनाच अचानक चुरशीची लढाई झाली होती यात सरपंच सौ वर्षा पाटील,रामेश्वर पाटील आणि माजी उपसभापती संजय पाटील यांनी बाजी मारली तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी सोसायटी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे.शिरपूर तालुक्यात देखील अनेक गावांचे निवडणूक कार्यक्रम टप्या टप्प्याने राबविण्यात येत आहे.तालुक्यातील काही गावात निवडणूका बिनविरोध झाल्या तर काही ठिकाणी वि.का.सोसायटीच्या निवडणूका सत्ताधारी आणि विरोधक यांच्या सामंजस्यांने लढविण्यात येत आहेत. हिसाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची 2022-27 या कालावधी साठीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली.

हिसाळे येथील वि.का.सोसायटी निवडणुकीत प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.वर्षा रामेश्वर पाटील, रामेश्वर रामकृष्ण पाटील आणि माजी उपसभापती संजय पाटील यांच्यात एक मत होऊन चेअरमन पद अडीच अडीच वर्ष ठरवून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.मात्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपले सात जागेवर उमेदवारांना ऊभे केल्याने वि.का.सोसायटीच्या निवडणूक लढण्यासाठी पुढे यावे लागले.यात मात्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांना पराभव स्विकारावा लागला आहे.

डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सौ वर्षा रामेश्वर पाटील श्री रामेश्वर रामकृष्ण पाटील आणि आमदार अमरिशभाई पटेल व जि.प.अध्यक्ष तुषार रंधे यांच्या नेतृत्वाखाली उपसभापती संजय पाटील यांनी एकत्र येत भारतीय कम्युनिस्ट पक्ष विरूद्ध निवडणूक लढवली.यात पाटील जनाबाई दिलिप,पाटील स्वाती विकास,करंकाळ जितेंद्र श्रीधर,पाटील बाळु कौतिक,जैन माणकचंद मिश्रीलाल,खैरनार भिका सिताराम,परदेशी प्रताप नारायण
परदेशी संतोष शिवलाल,पाटील दिपक सुरेश,पाटील ज्ञानेश्वर गंगाराम,पाटील संजय संतोष,पाटील वसंत कौतिक
,जाधव वसंत रामसिंग आदींनी विजय मिळवला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: